वडगाव मावळ -कान्हे फाटा येथील पूनम पेट्रोल पंपाच्या उघडे असलेल्या कार्यालयात शिरून लोखंडी कपाटातून कामगाराने पाच लाख 56 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. रविवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजता घडली.
सुनील प्रसाद यांनी रोकड चोरल्याची फिर्याद वडगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली. हिमांशू उर्फ अंशु कुमार केशव राय रा. पूनम पेट्रोलपंपाचे मागे, कान्हे फाटा, ता. मावळ, मूळ रा. एकडांगा, ता. मीरगंज, जि. गोपालगंज राज्य बिहार) असे चोरी करणाऱ्या आरोपी कामगाराचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू उर्फ अंशु राय हा पूनम पेट्रोलपंपावर कामगार म्हणून काम करीत असताना पेट्रोलपंपाच्या उघडे असलेल्या कार्यालयात शिरून लोखंडी कपाटात लॉक करून ठेवलेली रोख रक्कम पाच लाख 56 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. कामगारानेच चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली. कामगारांची संपूर्ण चौकशी करूनच त्याला कामाला ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी केले. उपनिरीक्षक दिलीप देसाई तपास करीत आहेत.