पिंपरी : 70 लाखांसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी -माहेरहून सत्तर लाख रुपये घेऊन यावेत, यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विवाहितेच्या सासरच्या पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार प्रमोद कुमार प्रजापती, जिन्नू प्रसाद प्रजापती, सुशीला देवी प्रजापती, पूनम देवी प्रजापती, राजेश कुमार प्रजापती (सर्व रा. मीठापुर, दिल्ली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेकडे घर खरेदी करण्यासाठी माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी महिलेस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

हा प्रकार जुलै 2008 ते एप्रिल 2019 या कालावधीत घडला. याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.