नवी दिल्ली – निवडणूक प्रचाराच्या काळात हिंदुंविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यांना या नोटीशीला 12 एप्रिल पर्यंत उत्तर द्यायचे आहे. तो पर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही तर निवडणूक आयोग त्यांच्या विषयी परस्पर निर्णय घेईल असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात करीमनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केले होते. त्यांच्या विधानाच्या क्लीप आयोगाला सादर करण्यात आल्या आहेत. पण त्या क्लीप तेलगु भाषेतील असल्याने त्याचे इंग्रजी भाषांतर करण्याची सुचना आयोगाने केली आहे. तथापी सकृती दर्शनी त्यांनी केलेल्या विधानावरून समाजात द्वेष भावना निर्माण होणची शक्यता व्यक्त होत असल्याने त्यांच्या विरोधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे.