अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचा जेटली यांचा दावा
नवी दिल्ली -मार्च महिन्यात 1.06 लाख कोटी रुपयाचे जीएसटी संकलन झाले आहे. त्यामुळे 2018-19 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला जीएसटीतून 11.77 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
त्यामुळे आनंदी झालेले अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ज्या अर्थी जीएसटीचे संकलन 1.06 लाख कोटी रुपये इतके झाले आहे, त्याअर्थी अर्थव्यवस्था विस्तारत असून रोजगार निर्मिती होत आहे. गेल्या वर्षी 11.47 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. आता त्यात बरीच वाढ झाली आहे. आगामी वर्षातही यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जेटली यांना वाटते. याबाबत बोलताना ई वाय टॅक्स या कंपनीचे भागधारक अभिषेक जैन यांनी सांगितले की, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कर संकलन वाढणे अपेक्षित होते. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापेक्षा या वर्षाच्या मार्च महिन्यात जीएसटीचे संकलन 15.6 टक्क्यांनी वाढले आहे.