Uddhav Thackeray on Amit Shah। आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रीप्रेमाने राष्ट्रवादी पक्ष फुटला, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी केली होती. ते भंडाऱ्यातील प्रचारसभेत बोलत होते. त्यांच्या या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला आहे. त्यामुळे मी पुत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमकं स्थान काय आहे? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचंय, तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या. फडणवीस म्हणाले होते. मी पुन्हा येईन. ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
सरकार चालवण्याचा अधिकार नाही Uddhav Thackeray on Amit Shah।
सलमान खानच्या घावर गोळीबार करण्यात आला त्याविषयी “ज्या पद्धतीने खुलेपणाने गुंडागर्दी सुरू आहे. सरकारला सत्ता चालवण्याचा अधिकार नाही. घटनाबाह्य सरकार सरकार चालवत आहे. गुंड कोणीही गोळीबार करत आहेत. यांच्यात त्यांना रोखण्याची हिंमत नाही. तो कोण आहे? आला कसा, गोळीबार करून कसा जात आहे. ?यांचं लक्ष नाहीये”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
मविआच्या संयुक्त सभा होणार? Uddhav Thackeray on Amit Shah।
“काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहे. दोन दिवसात होतील. आम्ही राज्यासाठी वचननामा वेगळा द्यायचा का यावर विचार करत आहोत. त्यानंतर सभांबाबत चर्चा होणार आहे”, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. आघाडी आणि युती होते तेव्हा काही गोष्टी सोडाव्या लागतात. अमरावती, रामटेक आणि कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या. भाजपला हरवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेतृत्वाने समजून सांगितलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.