Vijay Wadettiwar On Raj Thackeray – राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी शंका वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे.
मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. वडेट्टीवार यावेळी बोलतांना म्हणाले, राज ठाकरे हे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकणार नाही, असे ते वारंवार सांगत होते. । Vijay Wadettiwar On Raj Thackeray
मात्र, दिल्लीची वारी त्यांना करावी लागली. यात कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचे, त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होतेय का, अशी शंका सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, असेही त्यांनी म्हटले.
वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासह राज ठाकरे झुकणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ”राज ठाकरे दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाहीत, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. म्हणूनच आज राज ठाकरे जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम –
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे, हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे.
चंद्रपुर येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रचारसभेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम करण्यात आले. अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य तो धडा शिकवेल, अशी टीकाही विजय वडट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केली आहे.