बारामती/जळोची ( Ajit Pawar on Sharad Pawar ) – बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांना अनेक टोले लगावले..यामध्येच एक मुद्दा होता तो महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या निवडीचा त्यांनी सांगितले की, महादेव जानकर यांना राजेश विटेकर हे निवडून येण्याची क्षमता असतानाही आम्ही परभणीची जागा दिली आहे. पण या जाणकारांवरही त्यांनी गळ टाकला होता.. असे सांगत अप्रत्यक्षरित्या शरद पवारांचा उल्लेख केला.
अजित पवार म्हणाले जानकरांवर गळ टाकला होता, पण मासा अडकायच्या आत आम्ही मासा काढून घेतला. अहो ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात असे म्हणत अजित पवार काही वेळ थांबले आणि म्हणाले त्यांच्यातलीच जीन्स माझ्यात आहेत.
अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे, वस्तादाने डाव टाकला पण दादांनी चितपट केलं? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( Ajit Pawar on Sharad Pawar )
‘अहो चार दिवस सासूचे असतात चार दिवस सुनेचे असतात, पण आजचे दिवस सुनेचे आहेत.. त्यामुळे सासऱ्यांनी आणि सासूने आता घरात बसावं. आता जर एवढे समजावून देखील वेगळं काही झालं तर तो मी शब्द वापरत नाही, नाही तर त्याची हेडलाईन होईल.. ‘अशा शब्दात अजित पवारांनी आटोपतं घेतलं.
अजित पवारांनी पवार कुटुंबासह सर्वांनाच इशारा दिला, मी तोंड उघडले ना, तर तोंड लपवायला जागा उरणार नाही…! | Ajit Pawar on Sharad Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील जिजाऊ भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी तब्बल दीड तास भाषण केले.. या दीर्घकाळ चाललेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील विरुद्ध असलेल्या इतरांनाही इशारा दिला मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड लपवायल जागा होणार नाही.. अशा स्वरूपाचा इशारा देखील अजित पवारांनी दिला.
अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे यांनी मला त्यांच्या मोबाईल मध्ये आलेले फोन दाखवले. ते फोन एकनाथ शिंदे यांनाही दाखवले आणि देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. त्यांनी माघार घेऊ नये याकरता कोणी कोणी फोन केले हे सगळे समजले. इतक्या खालच्या पातळीवर जातात मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा होणार नाही. | Ajit Pawar on Sharad Pawar