बारामती – रोहित पवार व युगेंद्र पवार या दोन राजकुमारांना सुरक्षा देण्यात यावी, असे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे पत्र सोशल मीडियामध्ये वाचायला मिळाले.
ज्या कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासाठीच काम केले. तेच कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना पाकिस्तानी आतंकवादी असल्यासारखे भासायला लागले का, असा सवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी केला आहे.
सोलनकर म्हणाले की, सुप्रिय सुळे यांच्या पत्रातून हे लक्षात येते की, बारामतीकरांचा विश्वास आज आपण गमावला आहे. मागील पंधरा वर्षापासून आपणास खासदारकीच्या निवडणुकीत निवडून देऊन सुध्दा आपण बारामतीकरांवर अविश्वास दाखवता.
एक बारामतीकर म्हणून मनाला खेदजनक वाटत आहे. आपण भावनिकतेचे राजकारण न करता बारामतीकरांसाठी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून जनतेला मते मागावीत. मग कळेल आपण किती विकासकामे केली. या पत्रातील अविश्वासाचे प्रत्युत्तर बारामतीकर आपल्याला मतदानाच्या दिवशी दाखवून देतील. असे सोलनकर यांनी स्पष्ट केले आहे.