नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2024-25 या काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा महसूल तीन ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता ICRA या संस्थेने व्यक्त केली. विशेष म्हणजे कालच अॅक्सेंचर या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने या वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा महसूल कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
जरी व्याजदर कमी झाले तरी जगभरातील बड्या कंपन्या बचावात्मक धोरण राबवतील आणि माहिती तंत्रज्ञानावरील खर्च कमी करतील असे अॅक्सेंचर या कपनीने म्हटले आहे. मात्र ICRA या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, जरी कंपन्यांचा महसूल कमी होणार असला तरी कंपन्यांच्या नफ्यावर मात्र फारसा परिणाम होणार नाही. कंपन्यांनी त्या दृष्टिकोनातून पुरेशी काळजी घेतली आहे.