Vice-Chancellor’s Cup 2024 ( T20 Cricket Tournament, Gadchiroli ) : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट-2024 स्पर्धेचा अंतिम सामना (17 मार्च, रविवार) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरुद्ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या संघात झाला.
अंतिम सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट संघाने परभणी संघास 37 धावाने पराभूत करून विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 147 धावांचे लक्ष्य दिले होते.
प्रत्युत्तरात परभणी विद्यापीठाच्या संघास 20 षटकात 6 बाद 109 धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्याचा मानकरी मनीष गायकवाड ठरला. त्यानं अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजीत 50 धावा अन् गोलंदाजीत 1 बळी घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक :-
पुणे विद्यापीठ : 20 षटकात 6 बाद 146 धावा :- (मनिष गायकवाड – 50, बसवंत गजलवार- 39, नितीन प्रसाद – 25, मनोज 2/21, माणिक, जमीर व हनुमान – प्रत्येकी 01 विकेट् ).
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
परभणी विद्यापीठ : 20 षटकात 6 बाद 106 धावा :- (धीरज पाथरीकर -44 , माणिक ढगे -22, संतोष यादव – 15, सचिन सुर्वे- 3/19 , संतोष सुगावे 2/19 मनीष गायकवाड 1/22 )