gashmeer mahajani । अभिनेता गश्मीर महाजनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देऊळ बंद’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. मराठी चित्रपटांसह त्याने ‘ईमली’, ‘तेरे इश्क मे घायल’ या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
सोशल मीडियावर देखील तो नेहमी सक्रिय असतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासह त्याच्या हँडसम लुकने त्याने अनेकांची मनं जिंकली आहे.
सोशल मीडियावर तो नेहमी आपला नवीन प्रोजेक्टबाबत माहिती देत असतो. तेच त्याचा वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असतो.
अनेकदा गश्मीर इन्स्टाग्रामवरुन askgashmeer हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. अशात याच सेशन दरम्यान त्याला एका चाहत्याने प्रश्न विचारला
यामध्ये चाहत्याने विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिल आहे. एका चाहत्याने गश्मीरला “मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का?” असा प्रश्न विचारला. यावर गश्मीरने अगदीच चोख उत्तर दिलं आहे. “नक्कीच…आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो…हा पॅटर्न तोडला पाहिजे”, असं गश्मीर म्हणाला. सध्या त्याने उत्तर चांगले चर्चेत आले आहे. यावर आता युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.