Loksabha Election 2024 BJP Candidate Second LIst –भाजपने बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, पंकजा मुंडे आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.
भाजपने याआधी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याचे भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मात्र, त्या पक्षाने दुसऱ्या यादीत गडकरी यांना स्थान देताना महाराष्ट्रातील अनेक जागांचा सस्पेन्स संपवला. गडकरी नागपूर या त्यांच्या बालेकिल्ल्यातून पुन्हा निवडणूक लढवतील. तर, पंकजा प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना विद्यमान खासदार आणि भगिनी प्रीतम मुंडे यांच्या जागी बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गोयल यांना मुंबई उत्तर, तर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील २० उमेदवारांचा समावेश आहे. त्याशिवाय, गुजरातमधील ७, तेलंगणा आणि हरियाणातील प्रत्येकी ६ उमेदवारांची नावेही त्या यादीत समाविष्ट आहेत. मध्यप्रदेशातील ५, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी २ उमेदवार पक्षाने जाहीर केले. त्रिपुरा आणि दादरा व नगर हवेलीतील प्रत्येकी १ उमेदवार भाजपने निश्चित केला.
कर्नाटकमधील भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा समावेश आहे. त्या राज्यातून माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.राघवेंद्र आणि तेजस्वी सुर्या या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाचा मंगळवारी राजीनामा देणाऱ्या मनोहरलाल खट्टर यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. खट्टर, बोम्मई आणि त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड) हे तीन माजी मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही हिमाचलमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
BJP releases its second list of candidates for the upcoming Lok Sabha elections pic.twitter.com/bpTvxfMkDr
— ANI (@ANI) March 13, 2024
भाजपच्या २० उमेदवारांची यादी
मतदार संघ नाव
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
रावेर – रक्षा खडसे
जालना- रावसाहेब दानवे
बीड- पंकजा मुंडे
पुणे- मुरलीधर मोहोळ
सांगली – संजयकाका पाटील
माढा- रणजीत निंबाळकर
धुळे – सुभाष भामरे
उत्तर मुंबई- पियुष गोयल
उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
नांदेड- प्रतापराव चिखलीकर
अहमदनगर- सुजय विखे पाटील
लातूर- सुधाकर श्रृंगारे
जळगाव- स्मिता वाघ
दिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
वर्धा – रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
अकोला- अनुप धोत्रे
नंदुरबार- डॉ.हिना गावित
(BJP releases second list of candidates for the Lok Sabha elections 2024)