– शहरातील विविध विकाकामांचे भूमिपुजन
बारामती – अजित पवार सर्वत्र उपलब्ध राहू शकत नसल्याने जिथं कमी तिथं मला हक्काने बोलवत आला आहात. तसेच जिथे कमी तिथे मी असणारच, मलाही बारामतीकरांचे प्रेम मिळेल, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
शहरातील संभाजीनगर रस्त्याची विकासात्मक कामे, बारामती तालुका नाभिक संघटनेचे सभागृह, वसतिगृहामुळे, हॉस्टेल या समाजातील मुले अभ्यासासाठी, लग्न समारंभ व समाजातील विविध कार्यासाठी या समाज उपयोगी सभागृहाचे वसतीगृहाचा उपयोग होईल. तसेच भाई कोतवाल सभागृहाचे, कांचन नगर येथील सामाजिक सभागृहाचे सुनीता पवार यांच्या हस्ते झाले.
गार्डन नाना नानी पार्क होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सागितले. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे याचेही विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 मधील कांचननगर येथे १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे (समाजोपयोगी कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारे सभागृह आणि गार्डन) भूमिपूजन आज सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. पवार पुढे म्हणाल्या की, बारामतीचा विकास अतिशय झपाट्याने होत असून हा संपूर्ण विकास अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आपण सर्वचजण त्याचे साक्षीदार आहात. परंतु मीदेखील सातत्याने सार्वजनिक जीवनात वावरत असून जिथे माझी गरज आहे तिथे मी कार्य करायला कायम तयार असते.
यावेळी शहराध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनीही आपली मनोगत व्यक्त केले. अभिजित जाधव यांनी प्रास्ताविक केले. सुनेत्रा पवार व मान्यवरांचे स्वागत अभिजित जाधव, निलीमा मलगुंडे व कांचननगरमधील नागरिकांनी केले. कांचन नगर येथे बोलताना पवार म्हणाल्या की, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी या प्रभागातील सर्व कामांमध्ये विशेष पुढाकार घेतला. किरण गुजर यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, किरण गुजर हे बारामतीत अजित पवार यांनी केलेल्या प्रत्येक विकास कामांचे साक्षीदार आहेत. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. हरीश गुजराथी यांनी आभार मानले.
यावेळी तालुकाध्यक्ष ज्योती लडकत,शहराध्यक्ष अनिता गायकवाड, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, इम्तियाज शिकीलकर, प्रताप पागळे, दीपक मलगुंडे,किशोर मासाळ, मंगेश ओमासे, राजेंद्र बनकर, अभिजीत चव्हाण, समीर चव्हाण, शुभम ठोंबरे, विशाल जाधव, गणेश काशिद, पंकज सावंत, संदीप बांदल, दत्तात्रय आवाळे, नलिनी पवार, वैशाली जगताप, द्वारका कारंडे, तानाजी बांदल, अविनाश लगड, सतीश देशमुख, सत्यवान शितोळे, बारवकर, संजय दराडे, प्रवीण माने आदी मान्यवर तसेच कांचन नगर भागातील नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा साक्षीदार
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनीही बोलताना सांगितले की, बारामतीचा विकास खऱ्या अर्थाने कोणी केला तर तो अजित पवार यांनीच. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, सुनेत्रा पवार या अनेक वर्षांपासून पर्यावरण,सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सातत्याने सक्रिय आहेत. याचा अनेक वर्षे मी स्वतः साक्षीदार आहे.