सासवड, (प्रतिनिधी)- पुरंदर तालुक्यातील दिवे येथील श्री कातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गणपत राघू शितकल यांची बिनविरोध निवड केल्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आमिना बागवान यांनी जाहीर केले. सासवड (ता. पुरंदर) येथील सहायक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयामध्ये श्री कातोबा संस्थेच्या चेअरमन निवडीचा कार्यक्रम झाला.
यावेळी राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव, पुरंदर हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव, संस्थेचे सचिव विजय कांबळे, व्हाईस चेअरमन मोहन जाधव, संचालिका देवयानी जाधवराव, दिनकर गायकवाड, दिलीप जाधव, राजेंद्र काळे, गजानन जाधव, संतोष जाधव, मोहन जाधव, वैभव झेंडे, नंदा जाधव, दादा जाधव, ईश्वर बागमार, रामभाऊ झेंडे, गंगाराम जाधव, दिनकर गायकवाड, अमित झेंडे, बबन लडकत, बिट्टू भांडवलकर, गुलाब झेंडे, रुपेश राऊत, रुपेश झेंडे, सचिन पठारे, विलास चव्हाण, निलेश जाधव उपस्थित होते.