सासवड, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुंभारवळणचे अमोल दत्तात्रय कामठे यांना देण्यात आले. ही नियुक्ती पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल अरुण गायकवाड यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आसल्याचे कामठे यांनी सांगितले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, सुदामराव इंगळे, विजयराव कोलते, बबन टकले, बापूसाहेब माहुरकर, शामकांत भिताडे, पुष्कराज जाधव, छायाताई यादव, गौरीताई कुंजीर, शिवाजी कोलते, चेतन मेमाणे, युवराज जगताप, राहुल गिरमे, विनोद जगताप, निलेश जगताप, जयदीप बारभाई, प्रकाश खाडे उपस्थित होते.