पिंपरी, (प्रतिनिधी) – दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ़ इंडियाच्या वतीने दिल्ली येथे सीए विद्यार्थी (विकासा) संस्था पिंपरी -चिंचवड शाखेस राष्ट्रीय स्तरावर मायक्रो श्रेणीतील सर्वोत्कृष्ट विकासा शाखा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दिल्ली येथे झालेल्या आयसीएआयच्या मेळाव्यात हा पुरस्कार सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला. विकासाचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, सचिव अनुराग कवाडे, उपाध्यक्ष सिद्धांत खंडेलवाल, खजिनदार डॉ श्रद्धा कुटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी आयसीएआयचे अध्यक्ष अनिकेत तलाटी, उपाध्यक्ष सीए रणजीतकुमार अग्रवाल,माजी अध्यक्ष सीए देबाशिष मित्रा, केंद्रीय परिषद सदस्य सीए पुरुषोत्तम खंडेलवाल, सीए पियुष छाजेड,सीए चंद्रशेखर चितळे, सीए पिंकी केडिया आदी उपस्थित होते. विकासा शाखेला आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सचिन बंसल,उपाध्यक्ष पंकज पाटणी, सचिव सारिका चोरडिया, खजिनदार शैलेश बोरे, माजी विजय बामणे, सचिन ढेरंगे यांचे सहकार्य लाभले.