Patna Pirates vs Gujarat Giants, Pro Kabaddi League 2024, Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 मध्ये आज दोन सामने झाले. पहिला सामना हरियाणा स्टीलर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचा 41-36 असा पराभव केला. हरियाणा स्टीलर्सने मोसमातील 9वा विजय नोंदवला. हरियाणाच्या विजयाचे अंतर 5 गुण होते.
तर प्रो कबड्डी लीगच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात पाटणा पायरेट्सने गुजरात जायंट्सचा 32-20 असा पराभव केला आहे. पाटणा पायरेट्सचा या मोसमातील हा 8वा विजय ठरला.
पटना की पलटन ने दर्ज की धमाकेदार जीत 🔥
गुजरात की जायंट आर्मी को हराकर 8वीं जीत की अपने नाम 💪💚#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PATvGG #PatnaPirates #GujaratGiants pic.twitter.com/s5jpNVbwNw
— ProKabaddi (@ProKabaddi) January 29, 2024
पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सवर विजय मिळवल्यानंतर हरियाणा स्टीलर्सचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला होता, मात्र पटनाने गुजरातवर विजय मिळवल्यानंतर हरियाणा स्टीलर्सची पाचव्या स्थानावर घसरण झाली.
पाटणा पायरेट्सने चौथे स्थान पटकावले आहे. पाटणाविरुद्धच्या पराभवानंतर गुजरात जायंट्स सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. बंगाल वॉरियर्स दहाव्या स्थानावर आहे.