पुणे – पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (वय ५७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.
धुमाळ एका दुर्घटनेत नुकतेच जखमी झाले होते. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. धुमाळ भारती विद्यापीठ भागात राहायला होते. सदनिकेतील गॅलरीतून ते पाय घसरून पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. धुमाळ यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.