पुणे – नियमित सरावाच्या दरम्यान प्रोटीन्स जास्त असलेला आहार घ्यावा तर मॅच पूर्वी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट्सचा वापर जास्त ठेवावा. उत्तम आहार व उत्तम व्यायाम यांची योग्य सांगड घातली असता सर्वोत्तम खेळाडू होणे सर्वांना शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अमोल सप्तर्षी यांनी केले.
पुणे जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध संघटनेच्या वतीने पंडित नेहरू स्टेडियम येथे खेळाडूंचा आहार या विषयावर आयोजित व्याख्यानावेळी डॉ. सप्तर्षी बोलत होते. अंकुरित कडधान्य, मांसाहार यातून उत्तम प्रोटीन्स मिळतात तर गहू, ज्वारी, तांदूळ यामधून कार्बोहायड्रेट्स उत्तम मिळतात, असेही ते म्हणाले.
ISSF World Cup 2024 Cairo shooting : ‘दिव्यांश सिंग पनवार’ची जागतिक विक्रमासह सुवर्ण कामगिरी….
यावेळी प्रा. कुशाबा पिंगळे, एड. दिनकरराव शिंदे, सुनील नेवरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणेश जाधव यांनी स्वागत केले संदीप पांढरे यांनी प्रास्ताविक केले, चंद्रकांत खराटे यांनी आभार मानले. शाम गिरमे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.