Nawazuddin Siddiqui बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाने सगळेच प्रभावित आहे. तो चित्रपटांमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका साकारताना दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल लोकांचा असा समज आहे की तो ड्रग ॲडिक्ट असू शकतो. याबद्दल त्याने नुकताच खुलासा केला आहे. सोशल मीडियावर अनेकदा अशा चर्चा असतात की, नवाजुद्दीन सिद्दीकीला दारूचे व्यसन नाही. तो खूप कमी दारू पितो, पण गांजा ओढतो असे म्हटले जाते.’
View this post on Instagram
या अफवांवर त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. जेव्हा होस्टने नवाजुद्दीनला त्याच्या आवडत्या पेयाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, “मी कधी तरी पिणाऱ्या लोकांन पैकी आहे. ” जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने पहिल्यांदा दारू कधी प्यायली.
यावर अभिनेता म्हणाला, “मी पहिल्यांदा एनएसडीमध्ये होतो आणि नाटक संपल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन करत होतो आणि सगळ्यांनी बिअर आणली होती. त्याआधी मी कधीच प्यायलो नव्हतो. मी सरळ होतो. मीही नाटकात पहिल्यांदा सिगारेट ओढली होती.” नवाजुद्दीन म्हणाला की तो सहसा दारू पीत नाही, त्याला होळीच्या दिवशी दारू प्यायला आवडते. “माझा आवडता सण होळी आहे, कारण त्या सणात तुम्हाला दारू प्यायला मिळते.”
नवाजुद्दीनला विचारण्यात आले की, तो कायदेशीर आहे अशा देशात गांजा ओढला आहे का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले की त्याला गांजा आवडतो. “मी त्याचा आनंद घेतो, जेव्हा मी संगीत सुरू करतो तेव्हा मी काहीतरी वेगळे बनतो.
दरम्यान, नवाजुद्दीनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘टिकू वेड्स शेरू’ आणि ‘हड्डी’मध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच ‘सेक्शन 108’ या चित्रपटात दिसणार आहे.