क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
लोणी धामणी – धामणी (ता. आंबेगाव) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती, तसेच ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ ते २८ डिसेंबर दरम्यान तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील ४५ शाळांमधील ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी डायनॅमिक भोसरी रोटरी क्लबचे अधक्ष ज्ञानेश्वर विधाटे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, विलास पगारिया, शांताराम जाधव, बबन भूमकर, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव वसंत जाधव, बाळासाहेब तुकाराम विधाटे, खडकवाडी सरपंच अनिल डोके, माजी सरपंच सागर जाधव, पोलीस पाटील सूरज जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम, सोसयटीचे अध्यक्ष कोंडीभाऊ तांबे,
शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गायकवाड, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले, कैलास महाराज सुक्रे, संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विधाटे, उपाध्यक्ष प्रदीप भूमकर, संचालक किशोर विधाटे, चंद्रकला भूमकर,अक्षय विधाटे, प्रसाद विधाटे, रोहित भूमकर, योगेश जाधव, राजाराम विधाटे, बाळासाहेब विधाटे, अमोल जाधव, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक अक्षय विधाटे यांनी केले.
वकृत्व स्पर्धा निकाल
गट क्र . १ – १ ली ते ४ थी – स्वरा जाधव (प्रथम) , अर्ष काळे (द्वितीय), स्वरा वाळुंज (तृतीय), वैष्णवी जाधव (उत्तेजनार्थ). गट क्र 2 – 5 वी ते ७ वी – यशवंत गेजगे (प्रथम), समृद्धी गवंडी (द्वितीय), पूर्वा काळे (तृतीय), महिमा रोडे (तृतीय). गट क्र . 3 – ८ वी ते १० वी – सानिका इंगवले (प्रथम), इश्वरी सैद (द्वितीय), दीक्षा पोखरकर (द्वितीय), रसिका बारवे (तृतीय), श्रेया थोरात (तृतीय). गट क्र . ४ ११ वी ते १२ वी – संस्कृती जाधव (प्रथम), सानिया शेख (द्वितीय), राजश्री हाडवळे (द्वितीय), अदिती चासकर (तृतीय), सानिका थोरात (तृतीय).