Harihara Mahapatra Net Worth: मुंबईस्थित उद्योगपती हरिहर महापात्रा यांनी 1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आर्थिक अडचणींचा सामना करणार्या एअरलाइन स्पाइसजेटला नवीन जीवन देण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीनंतर ते कंपनीचे 19 टक्के शेअरहोल्डर बनतील आणि कंपनीचे प्रवर्तक अजय सिंग यांची हिस्सेदारी 56.49 टक्क्यांवरून 38.55 टक्के होईल. स्पाईसजेटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यापासून हरिहर महापात्रा सातत्याने चर्चेत आहेत.
हरिहर महापात्रा कोण आहेत ?-
हरिहर महापात्रा आणि त्यांची पत्नी प्रीती महापात्रा हे मुंबईस्थित महापात्रा युनिव्हर्सल लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हरिहर महापात्रा यांना 16 वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव आहे. त्यांनी एमबीए केले आहे. महापात्रा युनिव्हर्सल लिमिटेड पायाभूत सुविधा, सल्लागार, ग्राहक, रिअल इस्टेट आणि रिटेल असे अनेक प्रकारचे व्यवसाय करते.
गुजरातमधील खजोद येथे देशातील सर्वात उंच इमारत बांधण्याची घोषणा केल्यावर हरिहर चर्चेत आले होते, परंतु साडेपाच कोटी रुपये खर्च करूनही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही.
हरिहर महापात्रा यांच्या पत्नी प्रीती महापात्रा यांनी इंटरनॅशनल बिझनेस फायनान्स आणि एक्सपोर्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. महापात्रा युनिव्हर्सल लिमिटेड कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रीती महापात्रा यांनी युरोप, आशिया आणि मध्यपूर्वेतील अनेक नामांकित ब्रँड लॉन्च केले आहेत. प्रीती यांना सामाजिक कार्यात विशेष रुची असून त्या एनजीओही चालवतात.
हे महापात्रा दाम्पत्य भाजप पक्षाच्या जवळचे असल्याचेही सांगितले जाते. प्रिती महापात्रा यांनी 2016 मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेची निवडणूकही लढवली होती आणि काँग्रेसचे कपिल सिब्बल यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती उघड करताना प्रीती यांनी 23 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते. आणि 6 कोटी रुपयांची देणी जाहीर केली होती.