Bihar School Holidays Reduction : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यामधील उर्दू शाळा, मुस्लिमबहुल भागात शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्ट्या जाहीर करताना त्यांनी हिंदू सणांच्या सुट्ट्यामध्ये मोठी कपात केली आहे.त्यांच्या या निर्णयामुळे बिहारचे राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. या निर्णयावरून भाजपने नितीशकुमार सरकारवर मोठा हल्लबोल केला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायर ब्रँड नेते गिरिराज सिंह यांनी नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. आगामी काळात नितीश कुमार मोहम्मद नितीश आणि लालू यादव यांना मोहम्मद लालू म्हणून ओळखले जाईल असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात गिरीराज सिंह यांनी एक निवेदन जारी करून सरकारवर निशाणा साधला.
जिस तरह से लालू यादव और नीतीश सरकार हिंदुओं पर हमला कर रही है, भविष्य में उन्हें मोहम्मद नीतीश और मोहम्मद लालू के नाम से जाना जाएगा। pic.twitter.com/Upw2sGUK1V
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) November 28, 2023
शाळांना सुट्या देण्यावरून झालेल्या वादावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, नितीश सरकारने पुन्हा तिसऱ्यांदा तुघलकीचा फर्मान जारी केला आहे. शिवरात्री आणि जन्माष्टमी या हिंदूंच्या महान सणांच्या सुट्ट्या कापण्यात आल्या आहेत. ईद आणि बकरीदच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये नितीश सरकार इस्लाम धर्माच्या आधारावर काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.असे त्यांनी म्हटले.
तसेच राज्य सरकारवर निशाणा साधत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, अररिया, किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार सारख्या ठिकाणच्या शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता असे दिसते आहे की सरकार संपूर्ण बिहारमध्ये शुक्रवारची इस्लामिक सुट्टी करण्याचा विचार करत आहे. आमच्या सुट्या पूर्ववत झाल्या नाहीत तर येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम नितीशकुमारांना भोगावे लागतील. त्यांना नितीश कुमार नाही तर मोहम्मद लालू यादव आणि मोहम्मद नितीश कुमार असे संबोधले जाईल.” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.