Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला गुरुवारी हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला, त्यानंतर सहार पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. हे विमानतळ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीद्वारे चालवले जाते. धमकी देणाऱ्याने मेल लिहून बिटकॉइन्स देण्याची मागणी केली आहे.
मुंबई विमानतळावरील सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या बदल्यात 1 दशलक्ष डॉलर्सची खंडणी मागितली. बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्सची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये लिहिले आहे की, जर 1 दशलक्ष डॉलर्सचे बिटकॉइन 48 तासांत ट्रान्सफर करा नाहीतर बॉम्बने उडवून देईन असं म्हटलं आहे. विमानतळासाठी ही अंतिम चेतावनी आहे. बिटकॉइनमधील 10 लाख यूएस डॉलर पत्त्यावर हस्तांतरित न केल्यास आम्ही टर्मिनल 2 पुढील 48 तासांत उडवून देऊ. 24 तासांनंतर आणखी एक सूचना दिली जाईल असेही या ईमेल मध्ये म्हटले आहे.
Maharashtra | A threat mail to blow up Terminal 2 International Airport was received. The sender demanded $1 million in Bitcoin within 48 hours to avert the blast. Mumbai’s Sahar Police registered a case against an unknown person under sections 385 and 505 (1) (b) of the IPC and…
— ANI (@ANI) November 23, 2023
गुरुवारी सकाळी 11.06 वाजता विमानतळाच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल प्राप्त झाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सायबर सेलही तपास करत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अनेकदा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.