Cold Weather : राज्यात थंडी (Cold Weather) आता सुरु झाली आहे. सगळीकडे गारठा (Winter) वाढल्याचे जाणवत आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra) काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागा (IMD) ने वर्तवला आहे. नोव्हेंबर (November) महिन्यात गारठा वाढला असली तरी, आणखी पारा घसरणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,राज्यात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूर (Kolhapur) त पावसाची शक्यता (Rain Alert) असल्याचे म्हटले जात आहे. या भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचसोबत गोव्यातही (Goa) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. केरळ (Karala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटक (Karnataka) मध्ये जोरदार पावसाची शक्यता (Rainfall Prediction) आहे. दिल्लीतही अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत (Mumbai Temperature) पहाटे तापमान कमी राहणार असून दुपारी तापमान वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडसह पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू-काश्मीरच्या गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये बर्फवृष्टी होईल. त्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये तापमान वाढ कायम राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. याच्या परिणामी संपूर्ण पूर्व आणि उत्तर भारतात पारा घसरून थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यासोबतच बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडवर याचा परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.