मुंढवा – केशवनगर येथील संभाजी चौक परिसरात केशवनगर ग्रामपंचायतीने सुलभ स्वच्छतागृह उभारले होते. दुरवस्था झाल्याने ते 12 वर्षे बंद अवस्थेत होते. यामुळे नागरिकांची कुंचबना होत होती. येथील अनिल भांडवलकर यांनी सतत पाठपुरवठा केल्याने महापालिकेने अखेर या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करून ते सुरू केले.
यावेळी मनपा परिमंडळ तीनचे उपायुक्त प्रसाद काटकर, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील, प्र.उप अभियंता गायकवाड, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा कोडापे, भरत गायकवाड, आरोग्य निरिक्षक नितीन कांबळे, विठ्ठल सोनवणे, कर्नल पंकज सक्सेना, महेश गिरी, श्रीधर पांडूळे, विजयकुमार काकडे, शशी लोखंडे, मोरे, नयनेश शिनलकर आदी उपस्थीत होते.
“सदर स्वच्छतागृह बारा वर्षे बंद अवस्थेत असल्याने गरीब कष्टकऱ्यांना ओढ्यामध्ये आडोशाला बसावे लागत होते. तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार व खासदार यांनी बारा वर्षे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नुतनीकरण करुन लोकार्पण होत असल्याने आनंद आहे.” – अनिल भांडवलकर, मोहल्ला कमिटी सभासद