World Cup 2023 New Zealand vs South Africa Match Live Score : विश्वचषकातील 32व्या सामन्यात न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. त्याचे 10 गुण आहेत. गुणतालिकेत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने सहापैकी चार सामने जिंकले आहेत. त्यात आठ अंक आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेने उभारली मोठी धावसंख्या..
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आफ्रिकेने 50 षटकांत चार गडी बाद 357 धावा केल्या. आफ्रिकन संघाकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकी खेळी खेळली. ड्युसेनने 118 चेंडूत 133 धावा केल्या तर डी कॉकने 116 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली. डुसेनने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले. तर डी कॉकने 10 चौकार आणि तीन षटकार लगावले.
डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार टेंबा बावुमाने 24 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन सात चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत टीम साऊदीने 10 षटकात 77 धावा देताना दोन विकेट घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले. बोल्ट यानं 10 षटकात 49 तर जेम्स नीशम यानं 5.3 षटकात 69 धावा दिल्या.
दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का..
दक्षिण आफ्रिकेने 47.1 षटकात 316 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन 133 धावांची संस्मरणीय खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम साऊदीला आणखी एक यश मिळाले आहे.
डी-कॉकनंतर डुसेनचं शतक…
रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने 101 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने शानदार खेळी खेळली असून दक्षिण आफ्रिकेने चांगली धावसंख्या गाठली आहे.
दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का..
क्विंटन डी कॉक 116 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. टीम साऊदीने त्याला ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. क्विंटन डी कॉकने ड्युसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागिदारी रचली. त्यापूर्वी क्विंटन डी कॉकने शानदार फलंदाजी करत आणखी एक शतक झळकावले. डी कॉकने 103 चेंडूत 2023 विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 200 धावांच्या पुढे गेली.
#CWC23 #SAvNZ : न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात एकेक बदल, जाणून घ्या… Playing 11
न्यूझीलंडला पहिले यश…
दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट 38 धावांवर पडली. कर्णधार टेंबा बावुमा 28 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले.