मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:साठी स्थान निर्माण केले नसेल, परंतु अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत राहते. ऋषभ पंतसोबत तिचे नाव यापूर्वी अनेकदा जोडले गेले आहे. मात्र याकडे दोघांनी नेहमीच दुर्लक्ष केले. मात्र नेहमीच स्टाइल आणि बोल्डनेससाठी ओळखली जाणारी उर्वशी पुन्हा एकदा तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीच्या वेगवेगळ्या फोटोशूटला चाहत्यांची देखील नेहमीच पसंती मिळत असते.
यावेळी उर्वशीच्या बाथरूम फोटोशूटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्सपासून ते हॉट फोटोशूटपर्यंतच्या झलक चाहत्यांसोबत शेअर करायला ती कधीच विसरत नाही.यावेळी अभिनेत्री बाथरूममध्ये आरशासमोर उभी राहून सेल्फी काढताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाचा बॉडी फिट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा फोटो क्लिक करताना उर्वशीने तिचा अर्धा चेहरा झाकला आहे.
View this post on Instagram
त्याचबरोबर उर्वशीने अॅक्सेसरीज म्हणून एका हातात डायमंडचे ब्रेसलेट कॅरी केले आहे. या लूकमध्ये उर्वशी खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी तिचा एल्विश यादवसोबतचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता, जो खूप पसंत केला जात आहे. याशिवाय ही अभिनेत्री लवकरच ‘स्कंदा’, ‘ऐ दिल है ग्रे’ आणि ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.