Live Cricket Score Today, India vs Australia 3rd ODI 2023 :- भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज (बुधवार)राजकोट येथे होत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह संपूर्ण मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखून ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्यासाठी सज्ज आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या सामन्याचा नाणेफेकीचा कौल(TOSS) ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे.(Australia won the toss and elected to bat)ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कमिन्सने प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. तर, तनवीर सांघा वनडेमध्ये पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-11 मध्ये बरेच बदल केले आहेत. रोहित स्वतः, कुलदीप आणि विराट संघात पुनरागमन करत आहेत. त्याचवेळी शुभमन, शार्दुल, अश्विन आणि ईशान खेळत नाहीत. अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर ऑफस्पिनरची भूमिका साकारणार आहे. ईशान किशनला व्हायरल ताप आहे.
दोन्ही संघ (Playing 11) पुढीलप्रमाणे :-
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.
दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 गडी राखून तर दुसरा सामना 99 धावांनी जिंकला होता. भारताची फलंदाजी ऑस्ट्रेलियापेक्षाही बळकट असल्याचे या दोन्ही सामन्यांत सिद्ध झाले होते. त्यातच आता प्रमुख फलंदाज रोहित व विराट संघात परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भरच पडणार आहे.