क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात जे चाहत्यांना खूप आवडतात. सध्या अशीच एक पोस्ट समोर आली आहे ज्यामध्ये नताशाने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
पण ही पोस्ट चर्चेत आहे कारण एक किसिंग व्हिडिओही दिसत आहे. नताशाने शेअर केलेला किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व डान्स करत आहे.
हातात ड्रिंक आहे आणि ते ओठ लॉक करू लागतात. हा व्हिडिओ नताशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मात्र ते कोण आहे याबाबत खुलासा झालेला नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक युजर्स ही नताशा असल्याचे म्हणत आहे. तर यावरून तिला ट्रोल ही केले जात आहे.
हे पोस्ट करताना तिने कॅप्शन लिहिले की, “स्मरणीय आठवणी.” यानंतर लोकांच्या कमेंट्स येत आहेत. खुद्द हार्दिक पांड्याने हार्ट इमोजी शेअर करून कमेंट केली आहे. एकाने लिहिले, “ती दुसर्या पुरुषाचे चुंबन का घेत आहे??” असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. तर काही चाहते तिची बाजू मांडताना दिसत आहे, त्या व्हिडिओमधील ती महिला नताशा नाही असा अंदाज चाहते लावते आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडिओवर सध्या तरी नताशा किंवा हार्दिक कडून कुठली प्रतिक्रिया आलेली नाही.