मुंबई – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाची नवी जर्सी रिलीज करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.खेळाडूंचं नव्या जर्सीतील हा अनोखा अंदाज पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यावेळेसच्या जर्सीवर ब्रँड आदिदासचा लोगो देखील पाहायला मिळत आहे.
जर्सीच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओममधील खास गोष्ट म्हणजे यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह संपूर्ण टीम नवीन जर्सीत झळकली आहे.बदल होत असतात परंतु त्यापेक्षा खेळ महत्वाचा असल्याचे हे खेळाडू यावेळी पटवून देताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.
टीम इंडियाचा नवीन जर्सीमध्ये वेगळाच स्वॅग दिसून येत आहे. आदिदास इंडियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून भारतीय संघाच्या नवीन जर्सीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमधील प्रत्येक खेळाडू यावेळी नव्या जर्सीप्रती आपला अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी सर्व खेळाडू मोठ्या थाटात आपलं म्हणणं मांडताहेत.
View this post on Instagram
आदिदासने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी अतिशय आकर्षक जर्सी बनवल्या आहेत. आदिदासने बनवलेली ही जर्सी चाहत्यांना खूप आवडते. विशेष म्हणजे आदिदास भारतीय संघाच्या जर्सीचा नवा प्रायोजक बनला आहे. आदिदास 2028 सालापर्यंत टीम इंडियासोबत असणार असल्याचे समजते.