मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कामातून ब्रेक घेऊन सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोनाली तिच्या नवऱ्याबरोबर सध्या तुर्की ट्रिपला गेली आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तुर्की जाऊन तिने साडी नेसून खास फोटोशूट केले आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
यावेळी सोनालीने तुर्कीतील लोकप्रिय ‘बलून कॅपाडोसिया’ या जागेला भेट दिली. यावेळी तिने वेस्टन ड्रेस परिधान न करता साडी घालण्याला प्राधान्य दिले. यामागचे कारणही तिने सांगितले आहे. सोनालीने इनस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘बलून कॅपाडोसिया’ ही जागा फोटोशूटसाठी खूप लोकप्रिय आहे. जगभरातून असंख्य लोक इथे खास फोटो काढण्यासाठी येतात. मॉडेल्स, नववधू त्यांच्या फोटोशूटसाठी, विंटेज कार आणि फ्लोइंग गाऊन भाड्याने घेतात.’
‘मी सुद्धा या जागेला भेट देत सुंदर फोटो काढले आहेत. याठिकाणी मी आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारी साडी नेसली होती. अनेक लोक इथे आल्यावर लांब ड्रेस घालतात परंतु, माझ्याकडे फोटोशूट करताना ड्रेसच्या लांब ट्रेलऐवजी साडीचा हा लांब पदर होता.’
View this post on Instagram
सोनालीने तुर्कीत जाऊन साडी नेसल्याने अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने कमेन्ट करत लिहिले की, ‘फोटोशूट खूपच अप्रतिम आहे आणि साडी नेसून भारतीय संस्कृती जपताना खूप भारी वाटलं’, सध्या तिचे हे फोटोशूट अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
मात्र, सोनालीला दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. सोनालीचे नुकतेच ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.