नवी दिल्ली – चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने आयपीएलच्या सोळाव्या मोसमात शानदार कामगिरी केली. डेव्हॉन कॉनवेनंतर तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे, ऋतुराज गायकवाडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात स्टँड बाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु त्याने आपले नाव या स्पर्धेतून मागे घेतल्याचे समजते. ऋतुराज सध्या विवाह बंधनात अडकणार असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे ऋतुराजने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून आपले नाव मागे घेतले. गायकवाड यांच्या जागी यशस्वी जैस्वालला इंग्लंडला पाठवण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. इतकंच नाही तर उत्कर्षा हे क्रिकेट जगतातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व आहे.
कोण आहे उत्कर्षा पवार
उत्कर्षा पवारचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. ती एक क्रिकेटरही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती महाराष्ट्राकडून खेळायची. उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करते. ती 18 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघाकडून शेवटचा सामना खेळली होता. समोर आलेल्या माहितीनुसार उत्कर्षा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (पुणे) येथून शिक्षण घेत आहे.
Meet Woman Cricketer Utkarsha Pawar 💛 To Be Wife of Ruturaj Gaikwad 💛 pic.twitter.com/OmVw2Z4VzU
— Junaid Khan (@JunaidKhanation) May 30, 2023
उत्कर्षा धोनी आणि आयपीएल ट्रॉफीसोबत दिसली
चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी पटकावली. यामुळे जवळपास सर्वच खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटो काढले. यामध्ये उत्कर्षा आणि ऋतुराज गायकवाड यांचा देखील समावेश होता. ट्रॉफी आणि महेंद्रसिंग धोनीसोबत हा जोडीनं फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यांनंतरच दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाली.