मुंबई – स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला यश मिळाल्यापासून ‘पुष्पा: द रूल’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाबाबत चाहते अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशात आता पुष्पा 2 बद्दल एक मोठे अपडेट आले असून रणवीर सिंगने चित्रपटात एन्ट्री केल्याचे बोलले जात आहे. रणवीरच्या पात्राचे अपडेट समोर आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगची ‘पुष्पा २’मध्ये एन्ट्री झाली असून तो या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पुष्पा एका पोलिसाला भेटेल, जो रणवीर असेल आणि त्यानंतर चित्रपटात बरेच बदल होतील. चित्रपटाच्या कथानकात झालेल्या बदलातून बरीच अॅक्शन आणि ट्विस्ट पाहायला मिळतात.
पुष्पा 2 चा टीझर आणि पोस्टर काही वेळापूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टर आणि टीझरमुळे चाहत्यांमध्ये पुष्पा 2 बद्दल आणखीनच उत्साह वाढला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुन तसेच रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने जवळपास 100 कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे, दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर धमाका करेल अशी अपेक्षा आहे.