IPL 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा सामना करायचा आहे. लखनौचा संघ प्लेऑफमध्ये दुसरा सामना खेळणार असून पहिला विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचवेळी मुंबईला प्लेऑफमध्ये आपला उत्कृष्ट विक्रम कायम ठेवायचा आहे.
प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मुंबईने प्लेऑफमध्ये 18 सामने खेळले असून 12 जिंकले आहेत. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. कुमार कार्तिकेयच्या जागी हृतिक शोकीनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians win the toss & elect to bat first against Lucknow Super Giants.
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1w8dt#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/UTtHTIMl9h
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे –
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.
सब्सीट्यूट्सः नेहल वढेरा, रमणदीप सिंग, विष्णू विनोद.
लखनौ सुपर जायंट्स : आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), क्रुणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान.
सब्सीट्यूट्स : काइल मेयर्स, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग, स्वप्नील सिंग, अमित मिश्रा