मुंबई – सिनेअभिनेता ‘फरदीन खान’ने वयाच्या 49 व्या वर्षी आपले अप्रतिम परिवर्तन (ट्रांसफॉर्मेशन) केले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचे वजन खूप वाढले होते. फरदीन खानचे वाढलेले वजन असलेले फोटो समोर आले तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. मात्र, नंतर त्याने आपले वजन कमी केले आणि आता फरदीन खाननेही मजबूत बॉडी बनवली आहे.
फरदीन खान शेवटचा 2010 मध्ये ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात दिसला होता. नुकतंच फरदीन खानने सोशल मीडियावर एक मॉन्टेज व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचे हे नवे शरीर खूपच शक्तिशाली दिसत आहे, ज्यावरून त्याच्या वयाचा अंदाज लावता येत नाही की तो 49 वर्षांचा आहे.
View this post on Instagram
त्याचे हे नवे परिवर्तन (ट्रांसफॉर्मेशन) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. तो संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’तून परतण्याच्या तयारीत आहे. सध्या तो त्याच्या लेटेस्ट लूकमुळे चर्चेत असून, फॅन्सला देखील अभिनेत्याचा हा नवीन अंदाज चांगलाच आवडला आहे. चाहते देखील त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तो वर्कआउट करताना दिसत होता. मात्र, त्याचे सर्व चाहते त्याच्या पुनरागमनाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसिरीजमधून तो धमाका करताना दिसणार आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर येणार आहे.