मुंबई – अभिनेत्री नुसरत भरुचा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. नुसरत भरुचा दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील आहे. तिचे वडील तनवीर हे व्यापारी आहेत. त्याचबरोबर आई तनसीम गृहिणी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त नुसरत टीव्ही सीरियल किट्टी पार्टीमध्ये दिसली होती. यामध्ये पूनम ढिल्लन मुख्य भूमिकेत होती.
यानंतर नुसरतने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या अभिनय कारकिर्दीच्या काही वर्षांतच, नुसरत आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव सारख्या बड्या कलाकारांसोबत दिसली. इंडस्ट्रीत ठसा उमटवण्यापूर्वी या अभिनेत्रीने 9 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष केला आहे. आज अभिनेत्रीच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल सांगणार आहोत.
नुसरत भरुचाने 2006 मध्ये रिलीज झालेल्या जय संतोषी मां या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील नुसरतच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. पहिल्या चित्रपटानंतर नुसरतला पुढील चित्रपटासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली.
नुसरतचा दुसरा चित्रपट कल किसने देखा थी हा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण अभिनेत्रीला खरी ओळख 2011 मध्ये रिलीज झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून मिळाली. नंतर नुसरत कार्तिक आर्यन आणि सनी सिंगसोबत आकाशवाणी चित्रपटात दिसली. हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला त्यामुळे अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली.
आकाशवाणी चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले होते. मी इतके उदास होते की मी या चित्रपटासाठी माझी पूर्ण फीही घेतली नाही. मी निर्मात्यांना सांगितले की, माझ्यामुळे त्यांनी पैसे गमावल्याने मी नाराज आहे. मी दीड वर्ष डिप्रेशनमध्ये होते. मग मला प्यार का पंचनामा २ मिळाला. चित्रपट हिट झाला आणि कसे तरी मी पुन्हा नॉर्मल झाले.