मुंबई – आयपीएल 2023 मधील सर्वात चर्चित खेळाडू असलेल्या अर्जुन तेंडुलकरशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला कुत्र्याने चावा घेतला आहे. स्वतः अर्जुनने याबाबत माहिती दिली. अर्जुनने सांगितले की, कुत्र्याने त्याच्या गोलंदाजीच्या हाताला चावा घेतला. अर्जुनचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात तो हाताला कुत्रा चावला असल्याचं मित्राला सांगत आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या पुढील सामन्यासाठी लखनौला पोहोचला होता. एकना स्टेडियममध्ये सराव सत्रादरम्यान अर्जुन लखनऊच्या खेळाडूंना भेटण्यासाठी गेला होता. हा व्हिडिओ लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले – ‘मुंबई से आय मेरा दोस्त.
इकाना येथे अर्जुनने युद्धवीर चरकला मिठी मारली. यादरम्यान युद्धवीर विचारतो – सर्व ठीक आहे का? यावर अर्जुन म्हणतो- होय, फक्त हाताला कुत्रा चावला आहे. यावर युद्धवीर विचारतात – कधी? उत्तरात अर्जुन म्हणतो – एक दिवसापूर्वी. यानंतर अर्जुन मोहसिन खानला भेटतो. तिघेही वेगवान गोलंदाज आहेत. अर्जुन आणि मोहसीन हे डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत, तर युद्धवीर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.
अर्जुनने यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध दोन षटके टाकली आणि 17 धावा दिल्या.यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला बाद करून त्याने आयपीएलची पहिली विकेट मिळवली. अर्जुनने पंजाबविरुद्धही एक विकेट घेतली. त्याने प्रभसिमरनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर गुजरातविरुद्धअर्जुनने दोन षटकांत नऊ धावा देऊन वृद्धीमान साहाची विकेट घेतली. एकूणच अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामन्यांत तीन विकेट घेतल्या आहेत.
Mumbai se aaya humara dost. 🤝💙 pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023
कुत्रा चावला असल्याच सांगणारा अर्जुनचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यामुळे मुंबईची चिंता तर वाढलीच आहे परंतु क्रिकेट प्रेमी देखील चांगलेच नाराज झाले आहेत.