पुणे – राज्यात उकाडा वाढत असला, तरी पुण्यात मात्र थंडी कायम असल्याचे दिसून येते. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. शहरात 13.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत उन्हाचा कडाका जाणवण्याचा अंदाज आहे.
बेमोसमी पावसानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होत आहे. पण, सरासरीच्या तुलनेत अजूनही दोन ते तीन अंश सेल्सिअस कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसात पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
किमान तापमान
पुणे – 13.6
सातारा – 13.6
नगर – 15.8
नाशिक – 16.6
कमाल तापमान
वर्धा – 37.8
चंद्रपुर – 37.6
नागपूर – 37.3
अकोला – 37.2