नेवासा – बंद असलेल्या पतसंस्थेचा लेखापरीक्षण अहवाल चांगला द्यावा व असलेल्या पावत्यांचा व्याजासह उल्लेख त्यात करावा यासाठी तीन लाखाची लाच मागणाऱ्या लेखापरीक्षक किसन सागर याला व त्याच्या साथीदार तय्यब पठाण यास एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी हा एका पतसंस्थेचा चेअरमन होता त्याच्या पतसंस्थेचे लेखापरीक्षण आरोपी किसन दिंगबर सागर, वय ५५, विशेष लेखा परीक्षक, वर्ग २, जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालय, सहकारी संस्था, अहमदनगर.हा राहणार-लक्ष्मी कॅालनी, गट नं १८४, सातारा परिसर , जि.छत्रपती संभाजीनगर. यांच्याकडे सोपवण्यात आले होते सदरच्या पतसंस्थेमध्ये संबंधित फिर्यादी व त्याचे नातेकवाईक तसेच मित्र मंडळाच्या असलेल्या पावत्याचा व्याजासह उल्लेख लेखापरीक्षण अहवालात करावा यासाठी व लेखापरीक्षणावर चांगलं लिहावे.
यासाठी आरोपी किसन सागर याने फिर्यादीकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती शेवटी तडजोड करत दोन लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले आज दुपारी नेवासा फाटा येथील बाळूमामा ज्युस सेंटर या दुकानांमध्ये फिर्यादी कडून दोन लाखांपैकी एक लाख रुपये ची लाच घेताना लाच लुचपत खात्याचे अधिकारी हरीश खेडकर व त्याच्या सहकाऱ्यांनी आरोपीस व त्याचा साथीदार तय्यब वजीर पठाण वय ४८, खाजगी लेखा परीक्षक, राहणार जळके खुर्द तालुका नेवासा.याना रंगेहात पकडले
या कारवाईमध्ये शर्मिला वालावलकर मॅडम,पोलीस अधीक्षकमा.श्री नारायण न्याहळदे सो. अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक. मा. नरेंद्र पवार सौ वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर यांचे सह पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शैख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांनी कारवाई पार पडली