मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मनसेकडून मेळाव्यासाठीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मेळाव्याचा टीजर प्रदर्शित केल्यानंतर मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये हिंदुह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/tNNFDn16nf
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2023
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. अशात मनसेने पोस्ट केलेल्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनानं स्व.बाळासाहेबांची इच्छा पूर्ण असं म्हणत मशिदींवरील भोंगे हटवल्याचे म्हंटले आहे. तसेच तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी… चला शिवतीर्थावर असे आवाहन देखील मनसैनिकांना करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी… चला शिवतीर्थावर !
॰॥ गुढीपाडवा मेळावा ॥॰
२२ मार्च २०२३, सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई.#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/kxy9QJnOif
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 18, 2023
टीजर देखील झाला होता व्हायरल व्हायरल
“ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व” या टॅगलाईन खाली मनसेने सभेचा टीजर देखील प्रदर्शित केला होता. “हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे ही पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील असा टीजरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी… चला शिवतीर्थावर !
॰॥ गुढीपाडवा मेळावा ॥॰
२२ मार्च २०२३, सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई. pic.twitter.com/iimfk1uEqw
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 20, 2023
येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची तोफ मुंबईतील शिवतीर्थावर धडाडणार आहे. मनसेकडून या सभेसाठी जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. राज ठाकरे यावेळी नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.