पुणे -राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान, भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे. पुढील अनेक वर्षे भारतीय चित्रपटांचे जतन खात्रीने केले जाईल. त्यामध्ये अनेक चित्रपट, लघुपट आणि माहितीपट डिजिटल पद्धतीने पूर्वस्थितीत आणले जातील, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफडीसी) केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी भेट दिली. त्यावेळी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेत असताना ते बोलत होते. पूर्वी सहजपणे उपलब्ध नसलेले अनेक चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम दर्जा राखून उपलब्ध करून दिले जातील असे सांगत अनुराग ठाकूर म्हणाले, अभियान जोमाने सुरु आहे. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात 3 मोठे प्रकल्प सुरु आहेत.
राहुल गांधींवर निशाणा
पुणे दौऱ्यावर ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींवर देखील निशाणा साधला होता. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून, ती भारत तोडो यात्रा ठरली. यात तीन राज्यातील निवडणुकांमध्ये कॉंग्रेस नेस्तनाबूत झाली, त्यांना देशात काहीच चांगले दिसत नाही, अशी टीका केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली होती. भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
.