दुबई – भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्या कारकिर्दीची अखेर पराभवाने झाली. सानिया आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या दुबई टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली.
या स्पर्धेत सानिया अमेरिकेच्या मॅडिसन किज हिच्या साथीत खेळली. सानिया-मॅडिसन या जोडीला रशियाच्या व्हर्नोकिया कुडेरमेटोव्हा-ल्युडमिला सॅम्सोनोव्हा जोडीकडून सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-0 असा पराभव स्वीकारावा लागला.
सानियाची दुहेरीतील कारकीर्द
– 531 लढतीत 242 विजय
– 43 विजेतीपदे
– 2015 साली क्रमवारीत अव्वल
– सहा ग्रॅंडस्लॅम विजेतीपदे (महिला व मिश्र दुहेरीत प्रत्येकी तीन)
जागतिक टेनिसमध्ये भारताचे नाव उंचवणाऱ्या 36 वर्षीय सानियाने 2003 साली व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला. तिने तब्बल सहा ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवण्यात यश मिळवले. त्यात मार्टिना हिंगीसच्या साथीने महिला दुहेरीतील तीन विजेतेपदांचा समावेश आहे.
PSL 2023 : पाक सुपर लीगला सट्टेबाजीचे ग्रहण; पाकिस्तान क्रिकेट मंडळ उचलणार कठोर पावले
मिश्र दुहेरीत सानियाने भारताचा टेनिसस्टार महेश भूपतीच्या साथीत 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपन व 2012 साली फ्रेंच ओपन अशी दोन, तर अमेरिकन ओपनचे एक विजेतेपद ब्रुनो सोआरेसच्या साथीत पटकावले.