मुंबई – व्हॅलेंटाईन डे सर्वत्र आनंदात साजरा केला होतो. एकमेकांवर प्रेम करणारे तरुण तरुणी असोत किंवा विवाहित पती पत्नी असतो सर्वजण व्हेलेंटाईन डे निमित्त काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेची मजा द्विगुणित करण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया एक भन्नाट संकल्पना समोर आणली आहे. अर्थात याचा वेड सिनेमाशी संबंध आहे.
काही दिवसांपूर्वी रितेश जेनेलिया वेड सिनेमा प्रदर्शित झाला होता. वेड या चित्रपटाने सैराट आणि लय भारी या दोन्हही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत केवळ दोन आठवड्यात चाळीस कोटींचा गल्ला गमावला आहे. यामुळेच सर्व टीमने मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशनदेखील केले होते. आता व्हेलेंटाईन डे निमित्त रितेशने तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेड चित्रपटाबाबतची एक खास ऑफर दिली आहे.
व्हॅलेंटाईन डे निमित्त वेड हा सिनेमा अवघ्या 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त रितेश जेनेलियाने ही खास ऑफर दिली आहे. याबाबतची एक पोस्ट देखील रितेशने सोशल मीडियावर शेअर केली आहे. “हा व्हॅलेंटाईन एक्सट्रा स्पेशल बनवा विथ ‘वेड’ ! थिएटरमध्ये जाऊन पहा फक्त 99 रुपयांमध्ये आजचा बुक करा” अशा आशयाची पोस्ट रितेशने केली आहे.
View this post on Instagram
रितेश-जेनेलिया ही खऱ्या आयुष्यातील जोडी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शनात देखील पदार्पण केले.