मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतलं आहे.
दरम्यान, आता ‘वेड’च्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ‘वेड तुझा..’ या सुपरहिट गाण्याचं नवं व्हर्जन नुकतंच रिलीज झालं आहे. होय, रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाबद्दल एक मोठी घोषणा केली होती. या चित्रपटाचं नवं व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने म्हटलं होतं.
अश्यातच हे नवीन गाणं प्रदर्शित झालं असून, यामध्ये सत्या आणि श्रावणीचा राेमॅन्टिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणं काही क्षणांपूर्वी रिलीज झालं आहे. रितेशने एक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सध्या हे गाणं सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.