मुंबई – अभिनेता रितेश देशमुख त्याच्या चित्रपटांसोबतच कौटुंबिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. मग कधी तो आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करतो तर कधी पत्नी जिनिलियासोबत विमानतळावर दिसतो. जिनिलिया आणि रितेशची लव्ह स्टोरी महाराष्ट्रालाच काय पण संपूर्ण देशाला माहिती आहे. मात्र जर तुम्हाला रितेशच पाहिलं प्रेम थोडं वेगळं होत असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खर आहे नुकतंच रितेशने याबाबत भाष्य केलं.
रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांनी तब्बल दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रितेशने अभिनेता म्हणून नाव मिळवल तर जिनिलियाने रितेशची पत्नी म्हणून कौटूंबिक जबाबदारी सांभाळली. दोघेही कधी ‘लय भारी’ तर वेड यासारख्या चित्रपटांमध्ये सोबतही दिसले. मात्र नुकतंच रितेशने एका मुलाखतीत आपल्या पहिल्या प्रेमाबाबत भाष्य केले.
यावेळी रितेशने वेड चित्रपटासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी रितेशला राजकारण की सिनेसृष्टी तुमचं पाहिलं प्रेम काय ? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर रितेश म्हणाला,”खरं सांगायचं तर माझं पहिलं प्रेम राजकरण आहे. परंतु मला राजकारणात येण्याची आजिबात इच्छा नाही परंतु ते माझं निश्चितच पहिलं प्रेम आहे. मी ज्या घराण्यात वावरलो आहे, त्यामुळे आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव ठेवणं, त्यामुळे ते कायमच माझं पहिलं प्रेम असेल”
“ते अपुरं प्रेम आहे, असंही मी म्हणू शकत नाही. ते प्रेम पुर्ण व्हावं अशीही इच्छा नाही. पण राजकारणाबद्दल प्रेम आणि आपुलकी कायमच असेल” असंही रितेशने यावेळी स्पष्ट केले. रितेश जिलियाचा वेड या सिनेमा लवकरच ओटीटीवर हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच आगामी काळात रितेश काही कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.