मुंबई – केंद्र सरकारने 14 फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’ला काऊ हग डे साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या आवाहनानंतर या निर्णयाबाबत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली. ‘काऊ हग डे’बाबतचे अनेक मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत/
सरकराने व्हॅलेंटाईन डे निमित्त गाईला मिठी मारण्याचे आवाहन केले आहे. यावरून आता सोशल मीडियावर अनेक जणांनी आपली मते मांडायला सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं, असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी याबाबत भाष्य केले.
आव्हाड यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाईला हग करण्यासाठी आल्याचे दिसून येते मात्र गाय काही केल्या त्या व्यक्तीला आपल्या जवळ येऊ देत नाही. असा काहीसा मजेशीर व्हिडीओ आव्हाड यांनी शेअर करत ‘काऊ हग डे’ चा सराव असं कॅप्शन दिले आहे. सरकराने घेतलेला हा निर्णय सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
Feb 14 ला #CowHugDay सराव pic.twitter.com/R4cMfgQgnB
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2023
येत्या 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करा असे फर्मान केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने काढले आहे. या दिवशी गायींना अलिंगन देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन सरकारने केलं आहे.सरकाराच्या या आवाहनानंतर हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.