पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी बहुमताने विजयी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) च्या वतीने निर्धार करण्यात आला. या निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीची ताकद दाखवून देण्यासह शिवसेना (शिंदेगट) पक्षाची संघटनाही मजबूत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतरच लगेचच बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर कार्यकारणीची नियोजन बैठक पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन, स्वारगेट येथे पार पडली.
जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, रमेश बाप्पू कोंडे,पुणे शहर महिला आघाडी प्रमुख लीनाताई पानसरे, युवासेना पुणे शहरप्रमुख निलेश गिरमे, शहर समन्वयक धनंजय जाधव,उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर,राजाभाऊ भिलारे, विकास भांबुरे, सचिन थोरात,विकी माने,संजय डोंगरे, संतोष लांडगे, युवासेना अध्यक्ष आकाश शिंदे, मयूर पानसरे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या कसबा पोटनिवडणुकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने पुणे शहरातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम करतील तसेच दिलेली जबाबदारी पार पाडतील असा निर्धार एकमताने करण्यात आला. तसेच पक्षाच्या उपशहरप्रमुख, विभागप्रमुख,विधानसभा प्रमुख शाखाप्रमुख,महिला आघाडी, युवासेना, वैद्यकीय आघाडी तसेच पक्षाच्या सर्व अधिकृत संघटना सक्रिय करण्याच्या सूचनाही यावेळी सहसंपर्क भोसले व शहरप्रमुख भानगिरे यांनी केल्या या बैठकीत केल्या.