पुणे – पुणे मनसेतुन नुकतेच बाहेर पडलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली, गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. माझिरे यांनी मनसेमध्ये माथाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पहिले होते. मनसे नेते वसंत मोरे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.
माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. माझिरे यांच्या पत्नीने नेमकं विष प्राशन करण्याचं कारण काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही.
माझिरे हे मनसेत नाराज असल्यापासून चर्चेत आले होते. वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला होता.