मुंबई – राज्यातील निवासी डॉक्टर उद्या, सोमवारपासून संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊनही सरकारकडून चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी मार्ड डॉक्टरांच्या संघटनेनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 1 जानेवारीपर्यंत सरकारने मागण्यांसंदर्भात चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. पण त्याला सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही.